Ad will apear here
Next
एमसीई सोसायटीतर्फे चार कला शिक्षकांचा गौरव
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्टस’च्या वतीने ‘१७ व्या आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे’ निमित्त ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार २०१८-१९’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय रुपयाच्या नव्या डिझाईनचे डिझायनर डॉ. उदय कुमार धर्मालिंगम यांच्या हस्ते वैभव कुमरेश (टू डी अॅनिमेटर), सुधाकर चव्हाण (आर्टिस्ट), नितीन देसाई (चित्रपट निर्मिती), रावसाहेब गुरव (आर्टिस्ट) या कलागुरूंचा गौरव करण्यात आला.

एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, सचिव लतिफ मगदूम, सहसचिव प्रा. इरफान शेख, प्राचार्य ऋषी आचार्य यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

‘कलाकरांच्या कामासाठी उत्कटता असणे आवश्यक आहे. जगावर राज्य करण्यासाठी आपण स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करावा’, असे डॉ. उदय कुमार धर्मालिंगम यांनी सांगितले.

दर वर्षी कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना, कलागुरुंना हे पुरस्कार देण्यात येतात.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZZIBU
Similar Posts
डॉ. पी. ए. इनामदार आणि ‘वेदा’ कॉलेजला ‘जीवनगौरव’ पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि सोसायटीच्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट स्कूल’ (VEDA) ला ‘एनडी वर्ल्ड’चे संस्थापक, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.
‘वेदा कॉलेज’ची एनडी फिल्म वर्ल्डला भेट पुणे : आझम कॅंपसच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅंड आर्ट्सतर्फे एनडी फिल्म वर्ल्ड भेट दौऱ्याचे आयोजन केले होते.
‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन पुणे : आझम कॅंपस येथील पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अ‍ॅंड आर्ट्सच्या वतीने (वेदा) इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पुण्यातील ३२ शाळांमधील चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पहिली ते दहावीतील मुलांचा समावेश होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language